-->
करमाळासामाजिक

ढोकरी येथे शिवजयंती निमित्त नेत्रचिकित्सा शिबीर संपन्न

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

ढोकरी ता. करमाळा येथे शिवजयंती निमित्त ढोकरी ग्रामस्थ, बुधराणी हाॅस्पीटल व आरोग्यम धनसंपदा, पुणे यांच्या संयुक्त सहभागातून नेत्रचिकीत्सा शिबीराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.

या प्रसंगी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर, आदिनाथ चे माजी संचालक भारत साळुंके, दत्ता बापू देशमुख, सुधीर बापू देशमुख, पै. शिवाजी खरात, शेतकरी संघटनेचे हनुमंत यादव, वांगीचे सरपंच विठ्ठल शेळके, गणेश पाटील, प्रगतीशील बागायतदार अर्जुन तकीक, माजी सरपंच शंकर खरात, विठोबा सलगर, भारत सलगर, सरपंच प्रतिनिधी किरण बोरकर, उपसरपंच प्रतिनिधी दत्ता खरात, पांडुरंग गडदे, ग्रा. प. सदस्य देविदास पाटील, अनिल वळसे व तरूण वर्ग उपस्थित होते. या शिबाराच्या शुभारंभ प्रसंगी प्रा. बंडगर यांनी ढोकरी, भिवरवाडी, बिटरगाव, वांगी परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा यासाठी आयोजन केले असल्याचे सांगीतले.

नेत्र चिकीत्सा बुधराणी हाॅस्पीटलचे डाॅक्टर मोहमद ठासरावाला आणि दिनेश जैन यांनी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसनराव कांबळे सर यांनी केले. या नेत्र तपासणी शिबिराचा ढोकरी गाव व पंचक्रोशीतील ७४ हून अधिक लोकांनी लाभ घेतला. सर्वांचे स्वागत हनुमान तरूण मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close