कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


कोरोनाच्या संकटकाळात लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांनी आपल्या प्राणाची बाजी लावत मोठ्या धाडसाने आजुबाजूस घडणाऱ्या घटनांचे वार्तांकन केले असून त्याचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या दिपाली शेळके यांनी व्यक्त केले.
शिक्रापूर, ता.शिरूर येथे सिमाई आधार फाउंडेशन ट्रस्ट महाराष्ट्र यांच्या वतीने कोरोना काळात विशेष योगदान दिलेल्या पत्रकारांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा “कोरोना योध्दा ” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. सिमाई फाउंडेशनचे कार्य आजही वाखाणण्याजोगेज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी जेष्ठ परिसरातील पत्रकार बांधवांचा शाल, श्रीफळ, सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिरुर तालुका माहिला काँग्रेस आघाडीच्या उपाध्यक्षा अरुणा मोहळ, माजी सैनिक नवनाथ डोके, पंतजलीचे शिरूर तालुकाध्यक्ष अंकुश घारे, बाभुळसरचे माजी सरपंच श्याम नागवडे, सामाजिक कार्यकर्ते रामदास नागवडे, राजेंद्र हरगुडे, मिनाक्षी हरगुडे, एकनाथ दिवटे, सुवर्णा ताठे, रयत क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षा छायाताई सकट, रोहिणीताई सिनलकर, जनसेवा बँकेचे सिनलकर, पंचायत समितीच्या सीआरपी अंजना सोनवणे, सीमाई फाऊंडेशनचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब कोकडे, पुणे जिल्हा युवती अध्यक्ष सुधा झेंडे, शिरूर तालुका अध्यक्षा आशा भांगे, फाऊंडेशनचे सचिव योगेश पवार, सहसचिव शशांक पवार, दीपाली राजगुरू, सामाजिक कार्यकर्ते बाळूभाऊ मोरे, फाउंडेशनचे शिरूर तालुका संपर्क प्रमुख बाळकृष्ण लोखंडे, मंगल भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिमाई आधार फाउंडेशन ट्रस्ट महाराष्ट्रच्या अध्यक्षा सिमाताई पवार यांनी केले. सुत्रसंचालन भाऊसाहेब कोकडे यांनी केले तर दिपाली राजगुरू यांनी आभार मानले.




