प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


भारतरत्न, गानसम्राज्ञी, भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. लतादीदींचं जाणं हे माझ्या प्रमाणे त्यांच्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी अतिशय दुःखद आहे. अशा शब्दात शोक व्यक्त करत तसेच जुन्या आठवणींना उजाळा देत ॲड. अजित विघ्ने यांनी लतादीदींनी श्रद्धांजली अर्पण केली.
लतादीदीच्या जाण्याने आज स्वर संगित हरपले आहे. खरं तर लता दीदींना माझे आई, वडील, चुलते बन्सिधर फार जवळुन ओळखायचे. मुंबईच्या सातरस्ता विभागात माझे कुटुंब वास्तव्यास होते. चुलते नेव्ही मधे ऑरनामेंट फॅक्टरी चे प्रमुख होते. त्यावेळी आमचे चाळीतील शिरसेकर नावाचे मंगेशकरांचे स्नेही शेजारी राहायला होते. ते आकाशवाणी मध्ये कामाला होते. त्यांचेकडे आणि माझ्या चुलत्यांकडे इंग्रजी शिकण्यासाठी त्यावेळी लतादीदी, आशाताई आणि मंगेशकर कुटुंबिय यायचे. कवियित्री शांताबाई शेळके या देखिल तेथे असायच्या. माझ्या आईला लतादीदी आणि शांता शेळके या वहीनी म्हणुन संबोधायच्या. लतादिदी आणि शांताबाई शेळके यांना मांजर फारच आवडायची. गावरान भाज्या सुद्धा लतादीदी ना खुप आवडायच्या. स्वर, ताल, संगिताचे शिक्षण घेऊन पुढे लतादीदींची ओळख गानसम्राज्ञी, गानकोकीळा म्हणून झाली. आज ही शिरसेकर कुटुंबाचे आणि त्यांचे स्नेहपूर्ण संबध जपलेले आहेत. लतादीदींच्या जाण्याने महालक्ष्मी मंदिराजवळचा प्रभुकुंज आज सुनासुना झाला असेल.
मध्यंतरी मी मुंबईला गेल्यावर आवर्जुन आमच्या शिरसेकरांच्या रंजाताई ची भेट घेतली. त्यावेळी आवर्जुन लतादिदींच्या तब्ब्येतीची चौकशी केली होती. त्या शतायुषी होतील अशी सर्वांनाच खात्री होती. परंतु, आज त्यांची अखेर प्राणज्योत मालवली आहे. मी व माझ्या संपुर्ण कुटुंबियां कडुन व मित्र परिवाराकडुन लतादिदींना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
अॅड. अजित सर्जेराव विघ्ने (उपाध्यक्ष, करमाळा बार असोसिएशन)




