-->
करमाळाराजकियसामाजिक

शाळेचा पहिला दिवस युवासेनेने केला गोड! आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मिठाई व शालेय साहित्य वाटप

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी गजबजून गेले आहेत. हिवरे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी आज सोमवार दि. १६ जून रोजी युवासेनेकडून विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, मिठाई व शालेय साहित्य वाटप करून विशेष स्वागत करण्यात आले.

 

करमाळा युवासेनेच्या वतीने शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल व नटराज कंपनीचे “बेस्ट ऑफ लक” किट देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सकाळी १० वाजता शाळेचा परिसर रंगीबेरंगी फुग्यांनी सजवण्यात आला. हालगीच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. गोड पदार्थांमध्ये जिलेबी व गोड भाताचे वाटप करण्यात आले. तसेच शासनाकडून प्राप्त पुस्तकेही याच वेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली. या उपक्रमात युवासेनेचे जिल्हाप्रमुख सचिन बागल, उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले.

या वेळी युवासेना तालुका युवा अधिकारी शंभूराजे फरतडे, शाखाप्रमुख निरंजन निकम, सरपंच दत्तात्रय माळी, उपसरपंच अतुल फरतडे, माजी उपसरपंच दिलीपभाऊ फरतडे, मुख्याध्यापक शिवाजी साबळे, सहशिक्षक नीळकंठ हनपुडे, जालिंदर हराळे, नवनाथ खरात, सुरेश शिंदे, सतिश सूर्यवंशी, पल्लवी कुलकर्णी, पोपट दुधाळ, दिनेश पाटील, दिपक लावंड, विनोद पाटील, जयराम शिंदे, दत्तात्रय विटुकडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकांकडून कौतुक

विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड केल्याबद्दल शिक्षकांनी युवासेनेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close