
करमाळा/प्रतिनिधी


करमाळ्यातील प्रसिद्ध उद्योजक निखिल प्रमोद चांदगुडे यांची युवा सेना (शिंदे गट) सोलापूर जिल्हा समन्वयक पदी (कार्यक्षेत्र करमाळा, माढा, सांगोला) नियुक्ती झाली असून या निवडीचे पत्र जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत व युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, करमाळा तालुकाप्रमुख देवानंद बागल, शहर प्रमुख संजय शीलवंत, उपशहर प्रमुख नागेश काळे, उपतालुकाप्रमुख दादा थोरात, वैद्यकीय सहाय्यक डॉक्टर कारंडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा तालुका समन्वय दीपक पाटणे, पैलवान दादा इंदलकर, शिवसेना युवा नेते विराज घाडगे, विनोद महानवर, भैरवनाथ शुगरचे अनिल दादा सावंत, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत, जिल्हाप्रमुख चरण चौरे पाटील, माळशिरस तालुका प्रमुख बाळासाहेब हिवरकर, समाधान दास आदी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
निखिल प्रमोद चांदगुडे करमाळातील प्रसिद्ध उद्योजक असून रिलायन्स पेट्रोलियम लँड डेव्हलपर प्रॉपर्टी डीलर म्हणून ते कार्यरत असून त्यांचे शिक्षण सिविल इंजिनिअर झाले आहे. चांदगुडे यांची संघटन कौशल्य करमाळा शहरात मजबूत असून याचा शिवसेना शिंदे गटाला मोठा फायदा होईल. असा विश्वास प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केला. हे नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चांदगुडे यांचा सत्कार करण्यात आला.
या नियुक्तीनंतर बोलताना चांदगुडे म्हणाले की, येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून दिवसातील किमान अर्धा वेळ जनतेची सेवा करण्यासाठी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी देणार आहे. गरजूंना मदत करणे व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांना दिली.




