-->
करमाळाराजकिय

तरटगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी भाजपचे किरण वाळुंजकर बिनविरोध निवड

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील तरटगाव येथील भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुका चिटणीस किरण वाळुंजकर यांची तरटगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी बिनविरोध निवड झाली.

तरटगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील एका जागेसाठी ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये वाळुंजकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. या निवडीबद्दल नूतन ग्राम पंचायत सदस्य वाळूंजकर यांचा सत्कार करमाळा भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात करण्यात आला.

यावेळी भाजपाचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश भाऊ चिवटे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, उपाध्यक्ष हर्षद गाडे, मनोज मुसळे, ओबीसी मोर्चाचे तालुका सरचिटणीस भैयाराजे गोसावी, शरद कोकीळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close