केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात दिपावली पाडवा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त मंदिरामध्ये श्रीं च्या गाभाऱ्यात पानाचे मकर व केळीच्या पानाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. ही सजावट पुजारी बाळू गुरव, गणेश गुरव, भैया मोकासी, ऊत्तरेश्वर टोणपे, अमोल गलांडे यानी केली आहे.
मंदिराच्या प्रवेशव्दारावर शुभम वेदपाटक यांनी सुंदर अशी रांगोळी काढली होती. हि रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. या कलाकाराचे भाविकांनी कौतुक केले. पहाटे पासून श्री च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. मंदिरातील सजावट पाहून भाविकाना मंदिरामध्ये प्रसन्न वाटत होते. या मंदिरात दर सोमवारी मंदिरातील पुजारी वेगवेगळ्या रूपात सजावट करतात. मंदिरातील जंयत गिरी महाराजाचे दर्शनासाठी कुटी मध्ये भाविकांची गर्दी होती.
आज पाडव्या निमीत्त बिचितकर वस्तीवरील शेरणी होती. यामध्ये बिचीतकर वस्तीवरिल सर्व भाविक सामील झाले होते. पाडव्या निमीत्त नवीन वाहन खरेदी केलेल्या भाविकांनी ही आपल्या नवीन वाहनाची पुजा मंदिरात केली.या मंदिरामध्ये अनेक भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पाडवा साजरा करण्यात आला.




