
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


बार्शीचे विधानसभा मतदासंघाचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार श्री. राजेंद्र राऊत यांनी आज (दि.२५) रोजी करमाळा तालुक्याचे माजी आमदार श्री. जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
आमदार राजेंद्र राऊत व माजी आ. जगताप यांचा जुना स्नेह आहे. सन २००४ ते २००९ या कालावधीत ते दोघेही विधीमंडळ सदस्य होते. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजेच एप्रिल २०१९ मध्ये आ. राजेंद्र राऊत यांच्या पुढाकारानेच जगताप गटाचे युवा नेते व माजी आमदार जगताप यांचे सुपुत्र शंभूराजे जगताप यांनी ना. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला होता. आ. राऊत यांनी जगताप यांची भेट घेत चर्चा केली. चहापान घेतले व तद्नंतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रवाना झाले.
यावेळी उद्योजक दिलीप गांधी, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष कुंडलिकराव गायकवाड, बार्शीचे माजी नगरसेवक प्रशांत कथले, विलास रेणके, विनोद काटे, माजी उपनगराध्यक्ष नारायण बापू जगताप, संतोष गुगळे, विठ्ठल क्षिरसागर आदी उपस्थित होते. या प्रसंगी माजी आ. जगताप यांनी आ. राऊत व अन्य मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.




