उजनी धरण १०० टक्के भरल्यामुळे युवा सेनेच्या वतीने जलपूजन

माय मराठी न्यूज नेटवर्क


सोलापूर जिल्ह्याला वरदायनी ठरलेले उजनी धरण पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने हे १०० % भरल्यामुळे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या वतीने उजनी धरणाचे जल पूजन करण्यात आले. तसेच या प्रसंगी पंढरपूरच्या विठूरायाला व गणपती बप्पाला साकडे घालण्यात आले की, या वर्षी तरी उजनी धरण पुढाऱ्यांच्या तावडीतून वाचावे व उजनी धरणाचे पाण्याचे नियोजन हे शेतकऱ्यांना वर्षभर पाणी पुरेल अशा पद्धतीने अधिकाऱ्यांनी करावे.
गेल्या वर्षी उजनी धरण हे ६३ % भरलेले होते. परंतु, अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे व सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जलसंपदा मंत्री व पाटबंधारे खात्याचे अधिकारी यांना हाताशी धरून गरज नसतानाही दोन दोन महिने कॅनॉल चालू ठेवून उजनी धरण मोकळे केले. जर याही वर्षी उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने नाही झाले तर अधिकाऱ्यांना खुर्चीवरती बसू देणार नाही. असा ईशारा युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे.
यावेळी जल पुजन करताना गुणा वाघ, शिवाजी वाघ, दिलीप निकम, बाळासाहेब व्यवहारे, तात्यासो पिसाळ, सोमनाथ वाघ, विकास भोई, ओम पराडे, अमित भोई, आदित्य भोई आदित्य इंगळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



