केम व्यापारी असोसिएशनच्या वतीने “या” कारणासाठी विविध मान्यवरांचा सत्कार.
केम प्रतिनिधी/ संजय जाधव :


करमाळा तालुक्यातील केम येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे ,माजी सरपंच किंगमेकर अजित दादा तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केम ग्रामपंचायत, केम येथील कोविड योद्धे, शिक्षक,केम केंद्र प्रमुख यांनी लसीकरणासाठी “केम पॅटर्न ” करून लसीकरण सुरळीतपणे केल्याबद्दल तसेच सर्व व्यापारी, दुकानदार,भाजीविक्रेते, गिरणी चालक यांना व्यवस्थित लसीकरण केल्याबद्दल केम व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सागरराजे दोंड यांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अजित दादा तळेकर, डॉक्टर पालखे, राहुल आबा कोरे, कोविड योद्धे समीर तळेकर, सागरराज तळेकर, दादा गोडगे, राजाभाऊ तळेकर यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व किंगमेकर अजित दादा तळेकर यांचा सत्कार सागर दोंड व व्यापारी असोसिएशन चे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच सर्व कोविड योद्धे यांचा सत्कार व्यापारी असोसिएशन चे वतीने करण्यात आला.
यावेळी व्यापारी असोसिएशन चे मंगेश वासकर, संतोष शेठ जगताप, खंडू वासकर,किरण तात्या तळेकर ,जितेंद्र वासकर, मारवाडी साहेब , येवले साहेब उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे म्हणाले की केम येथील कोविड योद्धे समीर तळेकर, सागरराज तळेकर, दादा गोडगे, राजाभाऊ तळेकर हे कौतुकास्पद काम करत आहेत. ज्याप्रमाणे राजकीय नेते मतदानासाठी गाड्या भरून मतदारांना मतदान करायला मतदान केंद्रावर नेतात, त्याचप्रमाणे हे कोविड योद्धे आपला जीव धोक्यात घालून हे सर्व जण नागरिकांना लसीकरण साठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वतः च्या गाडीवर घेऊन येतात.यांचा आदर्श सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना घेतला पाहिजे




