-->
करमाळाविशेष

वडगाव (द.) येथे गुरुवार पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

 

करमाळा/प्रतिनिधी

 

श्रीकृष्ण जन्मोत्सव प्रित्यर्थ वडगांव दक्षिण (ता. करमाळा) येथील महादेव मंदिर, येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन गुरुवार दि. ३१ ऑगस्ट २०२३ ते गुरुवार दि. ७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत करण्यात आले आहे. पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, ९ ते १० नाष्टा तसेच सायं. ६ ते ७ हरीपाठ ७ ते ८.३० भोजन रात्री ९ ते ११ हरिकिर्तन व ११ ते ४ हरिजागर असा या सोहळ्याचा दैनंदिन कार्यक्रम आहे.

 

या सोहळ्यामध्ये दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत अनुक्रमे ह.भ.प. ज्ञानेश्वरी दत्तात्रय रूपनवर खांबेवाडी, ह.भ.प. अमोल काळदाते महाराज निंभोरे, ह.भ.प. उत्तरेश्वर महाराज आळंदी, ह.भ.प. योगिता डोंबाळे डोंबाळवाडी, ह.भ.प. तुकाराम भारती महाराज शिवाजीनगर, ह.भ.प. विनोद महाराज रोकडे (विनोदाचार्य) कोळगाव, ह.भ.प. हनुमंत पाव्हाणे महाराज राक्षसवाडी यांची कीर्तन सेवा होणार आहे. तसेच गुरुवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. शुभम महाराज वसंतगडकर यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करून या सोहळ्याची सांगता होणार आहे.

 

बुधवार दि. ६ सप्टेंबर रोजी सायं. ५ ते ७ या वेळेत भव्य ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी सोहळा निघणार आहे. या प्रसंगी तसेच कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ वडगाव (द.) यांचेवतीने करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close