माय मराठी न्युज नेटवर्क


लग्न समारंभाहून निघाल्यावर वऱ्हाडाच्या गाडीचा अपघात होऊन पाच जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद-लासुर रोडवर सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. वैजापूर जवळ दोन आयशरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर २३ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवराई फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी तीन जणांची नावे कविता आबासाहेब वडमोर (वय ४५ वर्ष ), प्रज्ञा गौतम गायकवाड (वय १७ वर्ष), मोनू दिपक वावहळे (वय ०८ वर्ष) अशी असून मृत पाच जणांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे.
या अपघातातील जखमींना औरंगाबाद आणि नाशिक येथे हलवण्यात आले आहे. पहाटे तीनच्या सुमारास शिवराई फाटा येथे हा अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात लग्न लावून हे वऱ्हाडी नाशिकला जात होते.




