-->
करमाळासामाजिक

गेली १० वर्षे बंद असलेला वीजपुरवठा सुरळीत; सुजित बागल यांच्या मागणीला यश

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

मांगी येथील शेतकरी श्री. अभिमान किसन अवचर यांचे मांगी गावालगत कॅनल वरती शेती आहे व ते राहायला पण तिथेच आहेत. २०१० साली त्यांनी लाईट मिळावी यासाठी रीतसर कोटेशन भरले होते व वीज वितरण कंपनीच्या करमाळा येथील ऑफिसला तसे निवेदन ही दिले होते. मात्र काही तांत्रिक अडचणी सांगत हे काम रखडवले होते. वेळोवेळी वायरमन यांच्याकडे तक्रार देऊन ही दुर्लक्ष करण्यात येत होते.

त्यामुळे त्यांनी ही बाब मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुजित तात्या बागल यांचेकडे दाद मागितली. सुजित तात्या यांनी तात्काळ दखल घेऊन आ. संजयमामा शिंदे यांचेकडे या कामाविषयी मागणी केली आ. संजयमामा यांचे पी.ए. डॉ. विकास वीर यांनी ताबडतोब वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांना फोन करून या कामाविषयी पाठपुरावा करून ताबडतोब हा प्रश्न मार्गी लावण्याचे विंनती केली. वीज वितरण कंपनीचे अधिकारी जाधव साहेब व पवार साहेब यांनी पाठपुरावा करून हे काम पूर्ण करण्याचे सांगितले.

त्यामुळे गेली १० वर्ष अंधारात असणारे शेतकरी श्री. अवचर यांना लाईट मिळाली. त्यावेळी त्यांचे कुटुंबियांसह
दमदार आमदार श्री. संजयमामा शिंदे व श्री. सुजित तात्या बागल यांचे आभार मानले. या कामी लाईनमन संभाजी अंधारे व जोशी साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले .

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close