प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


वडगांव (ऊ) ता. करमाळा येथिल श्री. बाळासाहेब महादेव भांडवलकर यांनी ४० वर्ष ट्रक चालवत आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना १ मुलगा व १ मुलगी असून दोघांचे शिक्षण पूर्ण केले आहे. आईने घरकाम करून व वडिलांनी ट्रक चालवून आपल्या बिकट परिस्थिती वर मात करत मुलाला आरटीओ अधिकारी बनविण्याचा पराक्रम केला आहे.
महेश बाळासाहेब भांडवलकर याने जिद्द व चिकाटी ने आई वडिलांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. नुकत्याच झालेल्या राज्य आयोगाच्या परीक्षेत त्याने राज्यात ४९ व क्रमांक तर (EWS) प्रवर्गातून १४ क्रमांक पटकवला आहे. स्वप्नाच्या मागे धावताना आलेली संधी सोडायची नाही तर जिद्दीने व चिकाटीने प्रयत्न करून संधीचे सोने करायचे असा संदेश त्याने युवकांना दिला आहे.
शेतकरी कुटुंबातील महेश हा वडगाव (ऊ) या छोट्याशा गावातील प्रथमच मुलगा आहे कि जो पहिल्याच प्रयत्नात MPSC पास झाला आहे. त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या सर्व यशामागे आई वडिलांचा मुख्य वाटा असून सर्व मित्र परिवार व नातेवाईक यांचा ही सहकार्यचा मोठा वाटा आहे.
कोणताही अभ्यासाचा ज्यादा तास न लावता स्वतः अभ्यास करत महेश याने पहिली ते सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण वडगाव (ऊ) येथे पूर्ण केले व आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण शेजारील मांगी गावात ५ किमी साईकलवर ये-जा करून केले. त्यानंतर ११ वी, १२ वी कर्जत येथे आणि मेक्यानिकल अभियंता पदवी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे पूर्ण केले.




