-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

ओव्हर फ्लो पाण्याने मांगी तलाव भरला यात पुढाऱ्यांचे योगदान काय? शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा प्रश्न!

उन्हाळ्यात पाणी न आल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांची नुकसान झाले याला जबाबदार कोण?

 

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात कुकडी प्रकल्पातून करमाळ्याचे हक्काचे पाणी करमाळा तालुक्यात तसेच मांगी तलावातही आले नाही. यामुळे उभ्या क्षेत्रातील हजारो हेक्टर ऊस, केळी सारखी नगदी पिके जळून गेली. उन्हाळी कांद्याची लागवड झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे करोडो रुपयांची नुकसान झाले. तसेच मांगी तलावावरील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना सुद्धा बंद पडल्या. यामुळे गतवर्षी मांगी तलावात पाणी आले नाही या अपयशाचे धनी कोण? असा प्रश्न शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

 

कुकडी प्रकल्पातील सर्व धरणे भरल्यानंतर ओव्हर फ्लो चे पाणी खाली सोडावेच लागते. कोणी मागणी केली नाही तरी शासनाच्या नियमाप्रमाणे पाणी सोडावेच लागते. याच पाण्याने मांगी तलाव भरला ही आनंदाची गोष्ट आहे. पाऊस काळ चांगला झाल्यामुळे धरणे भरली व ओव्हर फ्लो चे पाणी मांगी तलावात जलसंपदा खात्याला सोडावे लागल्याने मांगी तलाव १०० टक्के भरला. मात्र या पाण्याची श्रेय लाटण्यासाठी चाललेली प्रसिद्धी ही हास्यास्पद असून तालुक्यातील जनता चाणाक्ष आहे. अशा खोट्या प्रसिद्धीला बळी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

 

मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी येण्यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजना करणे गरजेचे आहे. ही योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असून या योजनेचा सर्वे करण्याची निविदा शासनाने प्रसिद्धी करून संबंधित एजन्सीची नेमणूक केली आहे. लवकरच रीटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊन मांगी तलावाला कायमस्वरूपी पाणी मिळेल असेही त्यांनी शेवटी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close