-->
राज्यसामाजिक

MPSC कडून मराठा विद्यार्थांसाठी दोन पर्याय; ‘या’ तारखेपर्यंत करू शकतात निवड

प्रतिनिधी:

राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाचे आरक्षण राज्य सरकारने देऊ केले होते. परंतु ते आरक्षण पाच मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे विविध पदांसाठीची निवड भरती प्रक्रिया रखडलेली आहे. त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाच्या आरक्षणासाठी अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांना दोन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. या उमेदवारांना एक तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाच्या (EWS) आरक्षणाचा लाभ घेता येईल किंवा त्यांना खुल्या प्रवर्गाचा (OPEN) पर्याय म्हणजे या दोन पैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या बारा वेगवेगळ्या परीक्षांमधील एस ई बी सी विद्यार्थ्यांना या दोन पैकी एका पर्यायाची निवड करायची असून त्यासाठी त्यांना १७ जून ते २३ जून या कालावधी पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

१७ जून ते २३ जून या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन SEBC option change वर क्लिक करुन दोन पैकी एका पर्यायाची निवड करायची आहे.

वेगवेगळ्या आरक्षणाबाबत आता राज्य सरकारचे धोरण स्पष्ट होत असल्याने आता वेगवेगळ्या पदांसाठीचे मागणी पत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून लवकरात लवकर लोकसेवा आयोगाला देण्यात येईल आणि राज्य शासनामधील सर्व पदे भरली जातील अशी अपेक्षा एमपीएससीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close