-->
करमाळाराजकिय

तालुक्यातील रस्ते विकासासाठी ग्रामविकास विभागाकडून २ कोटींची तरतूद- आ. संजयमामा शिंदे

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांच्या दिनांक ०६ मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार सन २०२१-२२ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून ३० ५४ – २४ १९ लेखाशिर्ष आंतर्गत रस्ते व पूल परिक्षण कार्यक्रम नुसार गट ब व गट क या करमाळा मतदार संघातील एकूण १७ कामांसाठी ०२ कोटी रुपये निधीची तरतूद केली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

 

 

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मतदार संघातील ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांची सुधारणा या निधीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

 

 

यामध्ये चोभे पिंपरी ते गवळे वस्ती बारलोणी रस्ता -१० लाख, केडगाव येथील कुष्ठरोग कॉलनी ते केडगाव रस्ता -१० लाख, कुंभारगाव राशिन रस्ता -१० लाख, मांजरगाव कोर्टी रस्ता -१० लाख, कुंभारगाव ते हिंगणी रस्ता -१० लाख, सौंदे ते गुळसडी रस्ता -१० लाख, पाडळी ते शिंगटे वस्ती रस्ता -१० लाख, नेरले ते आवाटी रस्ता -१० लाख, चिखलठाण ते मुरूमाई नगर रस्ता -१० लाख, फीसरे-हीसरे-हीवरे-कोळगाव रस्ता -१० लाख, सौंदे ते फीसरे रस्ता -१० लाख, अर्जुननगर ते हिवरे रस्ता -१० लाख, पाथर्डी ते वरकुटे रस्ता -३० लाख, विहाळ ते चोपडे रस्ता -१० लाख, कुंभारगाव ते पानसरे रस्ता -२० लाख, गुळसडी ते कुंभेज रस्ता – ०५ लाख, धायखिंडी ते करंजे रस्ता -१० लाख या रस्त्यांची सुधारणा उपलब्ध निधी मधून केली जाणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close