-->
करमाळाराजकियसामाजिक

बांधकाम विभागाकडून जनशक्ती संघटनेची १३ कोटींची फसवणूक; ठेकेदारावर कारवाई करण्याचे दिलेले खोटे पत्र

 

प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे

पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला जोडणारा करमाळा तालुक्यातील कोर्टी ते आवाटी रस्ता एन.पी कन्ट्रक्शने दिलेल्या मुदतीत पूर्ण केल्यामुळे १८ फेब्रुवारी २०२२ रोजी जनशक्ती संघटनेने आंदोलन केले होते. यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने कंपनीला प्रति दिवस ८ लाख ५० हजार रुपये प्रमाणे १२ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड आकारला गेल्याचे पत्र बांधकाम विभागाने अतुल खूपसे यांना दिले होते. त्यावेळी जनशक्ती संघटनेने आंदोलन मागे घेतले. परंतु आज ६ महिने उलटूनही त्या कंपनीवर आकारलेला दंड वसूल केला नाही. दंड आकारलेले पत्र खोटे देऊन फसवणूक केली असल्याचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आंदोलन माघार घेण्यासाठी बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन १२ कोटी ७५ लाख रुपयांची संघटनेची फसवणूक केली आहे. जर संघटनेच्या माणसाची फसवणूक करत असतील तर सर्वसामान्य माणसाचं काय..? असा सवाल अतुल खूपसे पाटील यांनी केला आहे. कार्यकारी अभियंता तेलंग यांना ६ महिने झाले आणखी उत्तर दिलेलं नाही किंवा ठेकेदारावर कारवाई नाही. काम संथ गतीने चालू आहे. डांबरीकरण अत्यंत हलक्या प्रतीचे केले जात आहे. येणाजाणाऱ्यांना नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. मुरूमीकरण केल्यानंतर त्याच्यावरती पाणी मारलं जात नाही. कार्यकारी अभियंता तेलंग यांनी कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे वेळेत पूर्ण न होणारे काम सर्वसामान्यांना त्रास देणारी एन.पी कंपनी यांना पाठीशी घालण्याचा काम यांनी केलेले आहे.

अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा
कोर्टी ते आवाटी या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात जनशक्ती संघटनेने आंदोलन केले. सदर आंदोलन स्थगित करा यासाठी आंदोलनावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करण्याचे आश्वासन देत कंपनीला दंड आकारला होता. मात्र, आजतागायत कंपनी कडून एक रुपया देखील वसूल केला नाही. उलट या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आंदोलन उभे करणार.

अतुल खूपसे-पाटील
प्रदेशाध्यक्ष, जनशक्ती संघटना

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close