माय मराठी न्युज


Indian Army Recruitment Rally 2021:
विविध पदांसाठी भारतीय सैन्य भरती रॅली २०२१ आजपासून सुरू झाली आहे. यावेळी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आली असून ज्या इच्छुकांना अर्ज करायचा आहे ते joinindianarmy.nic.in वर विविध पदांसाठी अर्ज करू शकतात. भारतीय सैन्य भरती रॅली २०२१ विविध पदांसाठी पात्र उमेदवारांसाठी खुली आहे. सैनिक सामान्य ड्यूटी, सैनिक लिपिक, स्टोअर कीपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, टेक्निकल (एव्हिएशन ‘एक्स’ ग्रुप), नर्सिंग असिस्टंट आणि नर्सिंग असिस्टंट (पशुवैद्यकीय) कॅटेगरीजवर लागू करू शकतात. सांगायचे म्हणजे की ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्याबरोबरच उमेदवारांना केवळ एकाच वर्गात सहभागी होता येणार आहे त्यामुळे उमेदवार केवळ एकाच श्रेणीमध्ये अर्ज करू शकतात.
ठिकाणे आणि तारीख :
पंजाब(Punjab) :
फतेहगड साहिब, बरनाला, मानसा, संगरूर आणि पतियाळामधील इच्छुक उमेदवारांसाठी ६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२१ या कालावधीत पतियाळा येथील १ एडीएसआर मैदानावर (फ्लाइंग क्लबच्या समोर, पटियाला-संगरूर रोड) ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
हरियाणा (Haryana) :
भिवानी, चरखी दादरी, महेंद्रगड आणि रेवाडी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी १४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) :
श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी, कृष्णा आणि यनम जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांसाठी १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत विशाखापट्टणमच्या इंदिरा प्रियदर्शिनी स्टेडियमवर ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
गुजरात (Gujrat) :
आणंद, वलसाड, तापी, डांग, नवसारी, साबरकांठा, वडोदरा, मेहसाणा, सूरत, बनसकांठा, नर्मदा, महिसागर, अहमदाबाद, गांधीनगर, अरवली, छोटा उदयपूर, भरूच, खेडा, दाहोद, पंचमहाल जिल्ह्यासह दमण, दादरा आणि नगर हवेली केंद्र शासित प्रदेशातील इच्छुक उमेदवारांसाठी ५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२१ या कालावधीत गोधरा, पंचमहाल येथील कानेलव स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
कोरोना काळात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण युवकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.
देशातील कोविड-19 परिस्थितीमुळे या तारखांमध्ये आणि ठिकाणांमध्येही बदल होऊ शकतो.




