महत्त्वाची बातमी: संपूर्ण महाराष्ट्रात लोडशेडींग; आता घरगुती वीज ही मिळणार फक्त ८ तास

माय मराठी न्यूज नेटवर्क


आपल्या सर्वांना ज्या गोष्टींची चिंता होती ती गोष्ट आपल्या पदरी पडणार आहे. राज्यात विजेची मागणी वाढत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात भारनियमन म्हणजे लोडशेडिंग आखली जाणार आहे. अनेक दिवसांपासून वीजेचे संकंट घोंघावत आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. विजेचे बील भरा असे आवाहन वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. राज्यात सध्या ३,००० मेगावॅट ते ४,००० मेगावॅट विजेची तूट आहे.
थोडक्यात पण महत्त्वाचं
▪️लोडशेडिंग टाळण्यासाठी वीज खरेदीचे इतर पर्याय पाहण्याचे निर्देश
▪️राज्यात सध्या ३,००० मेगावॅट ते ४,००० मेगावॅट विजेची तूट
▪️महावितरणने जारी केले लोडशेडिंगचे नवीन वेळापत्रक
देशात सध्या कोळशाची कमतरता असल्यामुळे वीजनिर्मीतीला अडथळा येत आहे. उन्हाळा लवकर सुरू झाल्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होत असताना, गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्राला सुद्धा लवकरच ब्लॅकआउट किंवा लोडशेडिंगचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आता महावितरणने लोडशेडिंगचे वेळापत्रक जारी केले आहे. दरम्यान लोडशेडिंग टाळण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने महावितरणला वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि लोडशेडिंग टाळण्यासाठी वीज खरेदीचे इतर पर्याय पाहण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात काही भागात दिवसा आठ तास तर काही भागात रात्री आठ तास वीज मिळणार आहे.
दरम्यान राज्यातील विजेची मागणी आधीच २८,५८९ मेगावॅटवर पोहोचली आहे, जी लवकरच ३०,००० मेगावॅटपर्यंत वाढू शकते. वीज मागणी विक्रमी ८.२ टक्क्यांनी वाढली आहे. मुंबईची मागणी ३४०० मेगावॅट आहे, ती आणखी वाढू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्लॅकआउट किंवा लोडशेडिंग टाळण्यासाठी, राज्य मंत्रिमंडळाने शुक्रवारी झालेल्या विशेष बैठकीत राज्य संचलित वीज वितरण कंपनी महावितरणला कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून ६० मेगावॉट तात्पुरते ५.५० ते ५.७० रुपये प्रति युनिट दराने घेण्यास परवानगी दिली आहे. कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडकडून वीज खरेदीसाठी महावितरणचा पुढील अडीच महिन्यांचा खर्च १०० कोटी ते १५० कोटी रुपये असणार आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. राज्याच्या तिजोरीवर कोणताही बोजा पडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.




