प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


गेल्या काही दिवसांपासून करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटात तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांचे इन्कमिंग सुरूच आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक नेते आ. शिंदे गटात जाहिर प्रवेश करत आहेत. आ. संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात केत्तुर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान ग्रा. सदस्य पांडुरंग कनिचे, शहाजी कनिचे व दत्ता कनिचे यांनी आपल्या समर्थकांसह आ. शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.
आमदार संजय मामा शिंदे यांच्या विकासात्मक कामांना प्रेरित होऊन व त्यांची करमाळा तालुक्याच्या विकासा बद्दलची दूरदृष्टी पाहून तसेच आ. संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील माझ्या मच्छीमार बांधवांसाठी विविध योजना राबविणे व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांसह आ. शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती पांडुरंग कनिचे यांनी दिली आहे. केत्तूर ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांकरिता पाठपुरावा करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी केतुर चे माजी सरपंच राजेंद्र सिंह उर्फ अशोक पाटील माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने, ज्येष्ठ नेते दादासाहेब निकम मामा, चेअरमन दत्तात्रय कोकणे, राजेंद्र बाबर यांच्या उपस्थितीत शिंदे प्रवेश केला आहे.




