-->
करमाळाराजकियसामाजिक

जिल्हा परिषदे मार्फत “या कामासाठी”  ४ कोटी ७८ लक्ष ८३ हजार रुपये निधी मंजूर…

 

केम प्रतिनिधी : संजय जाधव

करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघात सध्या जिल्हा परिषदेच्या मार्फत विकासात्मक कामाचा धडाका चालू झालेला आहे.करमाळा तालुक्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळाले व तालुक्यातील विकासाच्या कामाला चालनाच मिळाली.
करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट मा.श्री.नारायण(आबा)पाटील यांच्या नेतृत्वाखाली सध्या तालुक्यात विकासकामे जोरदार चालू आहेत.

जर वाडप्या आपला असला तर नक्कीच ताटात दोन घास जास्त मिळणार हे मात्र नक्की.त्याप्रमाणे सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री.अनिरुद्ध(आण्णा)कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत करमाळा तालुक्याला झुकते माप दिले आहे.तालुक्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषद अंतर्गत विकासकामे सुरू आहेत.

करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या मार्फत “दलित वस्ती” साठी ४ कोटी ७८ लक्ष ८३ हजार रुपये निधी मंजूर केला आहे

आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध करता येईल यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्या बरोबर केमचे मा.सरपंच मा.श्री.अजित(दादा)तळेकर यांनी नेहमी प्रयत्न केला. श्री.नारायण(आबा)पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या राम-लक्ष्मण जोडीने करमाळा तालुक्यात निधी आणण्यासाठी प्रयत्न केले व तालुक्यातील प्रत्येक गावात अगदी सामन्यातील सामान्य जनतेपर्यंत निधी पोहच केला.
भविष्यात अशीच विकासकामे आदरणीय श्री.नारायण(आबा)पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री.अनिरुद्ध(आण्णा)कांबळे व जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती व सदस्य यांच्या प्रयत्नातून मंजूर व्हावीत हि जनतेची अपेक्षा

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close