धरणग्रस्तांच्या मागण्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- माजी आ. नारायण पाटील
प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे


उजनी पाणी परिषदेच्या माध्यमातून धरणग्रस्तांशी झालेला संवाद हा पुढील पीढीच्या भविष्याचा वेध घेणारा ठरेल, अशी खात्री माजी आमदार नारायण पाटील यांनी बोलून दाखवली. करमाळा तालुक्यातील मौजे शेलगाव (वां) येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उजनी परिषदेची शेवटची सभा आज रविवार दि. ०५ मे रोजी शेलगाव (वां) येथे पार पडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काकासाहेब पाटील, दत्तात्रय केकाण, ठोकळ सर, भीमराव केकान, मच्छिंद्र खाडे, चौधरी आण्णा या मान्यवरांच्या हस्ते उजनी कलशाचे पुजन करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले की, उजनी पाणी परिषद म्हणजे कोणावर केवळ टिका टिपणी करण्यासाठी आयोजित केली गेली नसुन जे काही वास्तव आहे त्यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न या परिषदेतून आम्ही केला. विद्यमान आमदारांनी लाकडी-निंबोडीच्या रद्द आदेशाबाबत स्पष्टीकरण द्यावे की नाही हा ते मानत असलेल्या लोकशाहीचा भाग आहे. मला मात्र जनतेला गृहीत न धरता, जनतेला विचारात घेऊन काम करायला आवडते. कदाचित ही पध्दत लोकशाही अधिक बळकट करणारी आहे. शेवटी जनतेने आमदार म्हणून टाकलेल्या जबाबदारी मध्ये या मतदारसंघातील विकासाबरोबरच नागरिकांच्या हक्काची पायमल्ली होऊ न देणे, नागरिकांची फसवणूक झाली नाही पाहीजे, मतदार संघातील पाणी, उर्जा यांचे संरक्षण करणे या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. उजनी पाणी परिषदेत मांडलेल्या ठरावांना सर्व धरणग्रस्तांनी अनुमोदन दिल्याने शासन दरबारी याचा पाठपुरावा करुन या मागण्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणल्या शिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. राज्याच्या पुनर्वसन, पर्यटन तसेच पाटबंधारे व उर्जा खात्याच्या मंत्री महोदयांना भेटून धरणग्रस्तांच्या व्यथा आपण मांडणार आहेत. या सरकारच्या कालावधीत हे प्रश्न सोडवताना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तरी याचा पाठपुरावा आपण चालूच ठेवणार. हा एक लढा असुन प्रदुषण, पुनर्वसन व पर्यटन विकास या तीन गोष्टी ह्या काही राजकीय बाबी नसल्याने उजनी व धरणग्रस्तांच्या भविष्यावर परिणाम करणाऱ्या अशाच आहेत. कंदर ते कोंढारचिंचोली या उजनी पट्टयातील
शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पास आपला भक्कम पाठिंबा असून करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांना सुध्दा आता या प्रकल्पाचे महत्व समजले असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी आवर्जून सांगितले. प्रास्तविक माजी जि.प. सदस्य चंद्रप्रकाश दराडे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल तकीक यांनी केले. तर आभार सरपंच अमर ठोंबरे यांनी मानले.
या उजनी परिषदेस सभापती अतूल पाटील, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापूराव रणसिंग, दहिगावचे सरपंच जोतीराम नरुटे, उपसरपंच चंद्रकांत केकान, बहूजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा. अर्जुन सरक, महेंद्र पाटील, मुंबई महापौर केसरी पै. विजय गुटाळ, राजकुमार देशमुख, काका पाटील, गणेश जाधव, गणेश चौधरी, शेलगावचे माजी सरपंच नवनाथ केकान, ठोकळ सर, स्वीय सहाय्यक सूर्यकांत पाटील, संतोष खाडे, अमित केकान, संजय गलांडे, मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय कदम, रामेश्वर तळेकर, रोकडे सर, नानासाहेब गोडगे, संतोष कोपनर, निलेश राऊत, दादा लोंढे, अनिलकुमार गादीया, भारत साळवे, महेश कांडेकर, सुहास दराडे, विशाल तकिक, सुरेश जाधव, दत्तात्रय देशमुख, गणेश पाटील, वैभव पाटील, विकास पाटील, अतुल नलवडे, सुरेश नरुटे, बापू लोखंडे, कैलास ठोकळ, संजय पवळ, नवनाथ जायभाय, प्रकाश दगडे, अजिनाथ कोंडलकर, कांतीलाल खाडे, संतोष खाडे, भारत खताळ, सोमनाथ पोटे, राजाभाऊ जगताप, शिवाजी सरडे, भाऊसाहेब जगदाळे आदिसह मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले.




