केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता बारावी विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. या विद्यालयाची सलग चार वर्षापासूनची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम आहे.
इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांचा निकाल शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन पाहिला आहे. नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला असून या वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
१)प्रथम क्रमांक कु. आकांक्षा गाजरे (९४.८३ टक्के)
२) द्वितीय क्रमांक कु. दुर्वा तळेकर (९३.३३ टक्के)
३) तृतीय क्रमांक कु. गौरी गलांडे (९२.०० टक्के)
४) चतुर्थ क्रमांक कु. गोरी महागडे (९१.८३ टक्के)
५) उत्तेजनार्थ कु. लजिना पठाण (९१.१६ टक्के)
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन सुदर्शन बापू तळेकर, संजीव भाऊसाहेब बिचितकर, मुख्याध्यापक ए.एम. रंधवे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या विद्यालयाचे केम परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.




