
माय मराठी न्यूज नेटवर्क


बहुचर्चित राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवार दि. १० जून रोजी मतदान झाले. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी हे मतदान झाले. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी अत्यंत चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरस पाहायला मिळाली. याचबरोबर, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि भाजपचे पीयूष गोयल व अनिल बोंड हे पाच उमेदवारही विजयी झाले आहेत.
भाजप व महविकास आघाडी ने एकमेकांवर घेतलेल्या आक्षेपामुळे मतमोजणीला तब्बल ८ ते ९ तासांचा विलंब झाला. अखेरीस मध्यरात्री १:०० वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली. तर पहाटे ३:०० वाजल्यानंतर सर्व निकाल हाती आले. भाजपकडून तीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते. पियूष गोयल, अमरावतीमधून अनिल बोंडे आणि कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली होती. भाजपचे दोन्ही उमेदवारांसह धनंजय महाडिक सुद्धा विजयी झाले आहे.



