
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद, मुंबई या संघटनेच्या करमाळा तालुका समन्वयक पदी मांगी गावचे ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल व भोसे गावचे सरपंच भोजराज सुरवसे याची निवड करण्यात आली. सदर निवड शुक्रवार दि. ३० सप्टेंबर रोजी करमाळा पंचायत समिती सभागृहात आयोजित सरपंच संवाद अभियान कार्यक्रमांत सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या पत्राद्वारे करण्यात आली.
या निवडीनंतर बोलताना सुजित बागल म्हणाले की, करमाळा तालुक्यातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना बरोबर घेऊन करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकास साधण्याचा तसेच सर्व सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न सरपंच परिषदेच्या माध्यमातून करणार आहे.
यावेळी माजी सभापती किसन अण्णा शिंदे (पं.स. करमाळा), माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत (करमाळा नगरपरिषद), माजी सभापती दत्ताभाऊ अडसूळ (कृ. ऊ. बाजार समिती, करमाळा), खरेदी विक्री संघाचे व्हॉईस चेअरमन जनार्दन नलावडे, शहाजी शिंगटे, रघुनाथ काळे, राजेंद्र ढेपे, तुषार शिंदे, सुरज ढेरे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.




