
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


परकीय आक्रमक, बाबर याचा वंशज, हिंदू धर्म द्वेष्टा, क्रूरकर्मा औरंगजेब याची कबर छत्रपती संभाजीनगर या शहरात असून ही कबर काढून टाकण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन सोमवार दि. १७ मार्च रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल करमाळा यांच्या वतीने मा. तहसिलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे. सदर निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार मा. लोकरे साहेब व मा. गायकवाड साहेब उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी. औरंगजेबने हिंदू आणि शीखांवर खूप अत्याचार केला असून यात हिंदूंची हत्या, मंदिराचा नाश आणि हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर केले. अश्या क्रूरकर्मा व आतातायी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर हि पूर्णपणे स्वतंत्र भारत देशात गुलामीचे, अनंत यातनांचे प्रतिक आहे. त्यामुळे हा परकीय प्रभाव पुसून टाकण्यासाठी औरंगजेबची कबर पूर्णपणे नष्ट करण्यात यावी. अन्यथा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हिंदू समाजाला बरोबर घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व औरंगजेबची कबर ऊध्वस्त करतील. असा इशाराही दिला आहे.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे संतोष वाळूंजकर, बजरंग दलाचे सोलापूर विभाग प्रमुख ऋषीकेश चव्हाण, पंढरपूर जिल्हा सह संयोजक नाना तकटे, करमाळा तालुका प्रखंड संयोजक पवन कोठारी, सह संयोजक दादा चव्हाण, दादासाहेब सूर्यवंशी, ऋषी महामुनी, नागेश वाळूंजकर, यश जाधव, अनिल गोसावी, प्रशांत जगदाळे, लक्ष्मण साखरे, दीपक माने यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पायी मोर्चा काढून दिले निवेदन…
पायी मोर्चाची सुरुवात करमाळा शहरातील भवानी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली. त्यानंतर सुभाष चौक, आंबेडकर पुतळा, गायकवाड चौक, पुणे रोड मार्गे पायी जाऊन तहसील कार्यालयासमोर निवेदन देण्यात आले.




