-->
करमाळासामाजिक

स्वच्छ, सुंदर माझे गाव ही संकल्पना गावागावात राबवायला हवी – प्रवीण अवचर

 

माय मराठी न्युज नेटवर्क

खरतर आपल्या भारत देशाची रचना एवढी सुंदर आहे. सुसंस्कृत व ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा निसर्गाचे वरदान लाभलेला देश परंतु या देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून आपणच आपले गाव आपल्या शहरात काय करतोय याकडे हि लक्ष द्यायला हवे. देशात थोर विचारवंत व सामाजिक कार्य करणारे, स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे बाबांनी गावो गावी, खेडोपाडी, शहरात फिरून स्वतः हातात झाडू घेऊन स्वछतेचा संदेश दिला. मात्र आपण काय करतोय प्लास्टिक चा अतिवापर, मावा गुटखा खाऊन भिंती रंगवायच्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकायच, दिसली मोकळी जागा की कचरा टाकायचा, घाण करायची, प्रवासात पाणी पिऊन रिकाम्या झालेल्या प्लास्टिक बाटल्या कुठे हि फेकायच्या, चिंगम सारखे पदार्थ खाऊन रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी थुंकायच, झाडे तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करायचा, घराजवळूज जाणाऱ्या गटारीत घरातील विविध प्रकारचा कचरा, बाटल्या, प्लास्टीक अशा वस्तू टाकून गटारी तुंबवायच्या.
गेली कित्येक वर्षे आपण हेच करत आलो आहे.

प्रत्येक व्यक्तीने असे ठरवले की ज्याप्रमाणे स्वतःच्या घराची स्वछता ठेवतो, त्याचप्रमाणे बाहेर वावरताना पण त्याची दक्षता घेईल, ज्याप्रमाणे घरात कचरा होऊ देत नाही घरात थुंकत नाही तसा बाहेर पण मी कचरा फेकणार नाही किंवा गुटखा, मावा, तंबाकू खाऊन कुठेही थुंकणार नाही, प्लास्टिक चा अतिवापर करून कुठे हि फेकणार नाही. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी घाण करणार नाही. तर नक्कीच आपण रोगराईतून मुक्त होऊ शकतो. याचे दुष्परिणाम आपणास कळत आहेत परंतु त्यांची अमलबजावणी
करण्याची आपली मानसिकताच होत नाही हे दुर्दैव आहे. गेली कित्येक वर्षे आपण पाहत आहोत प्लास्टिक चा अतिवापर होत असल्याने गटारी, नद्या, नाले, समुद्र सगळीकडे प्लास्टिक चा खच पडला आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर बघाल तिकडे प्लास्टिकचे पिशव्या, बाटल्या, कचरा पडलेला दिसतो. तेच प्लास्टिक चूकुन आपल्या पाळीव मुक्या जनावरांना चरत असताना
पोटात जातात त्यामुळे भयंकर आजाराने कित्येक जनावरे दगावली आहेत.

आजकाल तरुणाई मध्ये चिंगम खाण्याची एक फॅशन झाली आहे. चिंगम चघळून झाला की, बिनधास्त रस्त्यावर किंवा उघड्यावर थुंकतात. तोच चिंगम नकळत पक्षांचे खाण्यात आला तर तो चिकट पदार्थ त्यांचे चोचीत किंवा नरड्यात अडकून बसतो. त्यामुळे काही दिवसात त्या पक्षांचा मृत्यू होतो. मोठ्या शहरात महापालिका, लहान शहरात नगरपालिका, गावात ग्रामपंचायत यातील स्वच्छता कामगार, वेळोवेळी सफाई करतात, स्वच्छता राखा म्हणून सूचना देतात. ओला कचरा, सुखा कचरा यासाठी वेगवेगळ्या कुंड्या देतात. परिसरात कचरा कुंड्या ठेवल्या जातात, गटारी स्वच्छ केल्या जातात. रस्ते सार्वजनिक ठिकाणे झाडून स्वच्छ केली जातात. तेवढ्यापुर्ती स्वच्छता दिसते मात्र तासाभरात पुन्हा तेवढाच कचरा घाण लोक करतात. मग त्यावर मोकाट जनावरे, डुकरे घाण करतात. त्यातून रोगराई पसरते, मच्छरांचं प्रमाण वाढते आणि त्यामुळे आजाराला निमंत्रण मिळते. त्यामुळे डेंगू, मलेरिया सारखे जीवघेने आजार पसरतात. म्हणून मला वाटते, आपणच सुज्ञ, जबाबदार नागरिक म्हणून स्वतः हून स्वच्छता ठेवयला हवी. प्लास्टिक चा अतिवापर टाळायला हवा. बाजारात येताना कापडी पिशवी घेऊन यायला हवी जेणेकरून प्लास्टिक चे कॅरिबॅग चा वापर कमी करता येईल. कचरा हा कचरा कुंडीतच टाकायला हवा किंवा तो एकत्र साचवून घंटा गाडीत द्यायला हवा. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळायला हवे. गाव खेड्यात उघड्यावर शौचाला बसने नागरिकांनी टाळायला हवे. शौचालयाचा वापर करायला हवा, स्वच्छता ठेवायला हवी, गटारी मध्ये घाण, कचरा टाकणे टाळायला हवं. आपणच जर प्रत्येकांनी ठरवलं आपलं गाव आपलं शहर आपला परिसर स्वच्छ ठेवायचं तर नक्की त्यात यश येईल आणि आपणास रोगराई पासून मुक्ती मिळेल.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close