-->
करमाळाकृषी विषयकसामाजिक

करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा – शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे

करमाळा प्रतिनिधी/ ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई साठी शासना कडे प्रस्ताव द्यावेत अशी मागणी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

फरतडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यात अनेक भागात मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.तुर सुर्यफुल ,मका बाजरी या पिंकाबरोबर वादळा मुळे अनेक ठिकाणी उसाचे फड पुर्ण पणे झोपले आहेत. भविष्यात पडलेल्या या उसाच्या पिकास तोडण्यासाठी टोळी वाले कोयता लावत नाहीत शेतकऱ्यांना आडवुन पैशाची मागणी केली जाते. या मुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना देखील पडलेल्या उसाच्या पिकाचा पंचनामा करुन दिलासा द्यावा .

तालुक्यातील पुर्व बागायत शेतीचे प्रमाण कमी आहे या भागातील शेतकऱ्यांची तुर ,बाजरी मका सुर्यफुल आशी पिके जोमात होती परंतु मोठ्या पावसा मुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.

नुकताच कोरोनातुन शेतकरी सावरत असताना अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने अधिकच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून तात्काळ जागेवर जाऊन पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत आशी मागणी शिवसेना
माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close