-->
करमाळाविशेष

करमाळा व जेऊर बस स्थानकाचे विस्तारीकरण करण्याची महेश चिवटे यांची मागणी

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा एसटी बस स्थानकाची जवळपास सहा एकर जमीन मोकळी असून यावर एसटी महामंडळाने बांधा, चालवा व हस्तांतरित करा या तत्त्वावर व्यापारी संकुल बांधून बस स्थानकाचे विस्तारीकरण करावे. त्याचप्रमाणे जेऊर येथील बस स्थानकाचे सुशोभीकरण करणे, यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणीचे पत्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे दिले आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तात्काळ पत्रव्यवहार करून या प्रश्नासंदर्भात निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

 

करमाळा शहराच्या मध्यवस्तीत एस टी महामंडळाची कोट्यावधी रुपयांची जमीन पडीक आहे. या जमिनीवर चारी बाजूने सुमारे ३०० ते ४०० व्यावसायिक गाळे दोन मजली इमारत करून होऊ शकतात. यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाचे साधन मिळेल. शिवाय एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल.

 

पंढरपूर, इंदापूर या ठिकाणी ज्या पद्धतीने बांधा, चालवा व हस्तांतरित करा. या योजनेत एसटी महामंडळाचे बस स्थानकाचे विस्तारीकरण झाले आहे. तसेच बार्शी बस स्थानकाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव ही मंजूर झालेला आहे. त्याच पद्धतीने करमाळा व जेऊरला प्राधान्याने स्थानक विस्तारीकरण व व्यवसाय गाडी उभारण्याला मंजुरी द्यावी. अशी मागणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.

 

करमाळा बस डेपो साठी नवीन वीस बस उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा या निवेदनात करण्यात आली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close