प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अर्थसंकल्पामध्ये करमाळा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी २४ कोटी निधीची तरतूद झाली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
२०२२-२३ या अर्थसंकल्पामध्ये प्रमुख्याने…
मिरगव्हाण- अर्जुननगर- शेलगाव क- सौंदे- वरकटणे- कोंढेज रस्ता प्रजिमा ८ सुधारणा करणे या रस्त्यासाठी ०१ कोटी ९० लाख, पांडे- शेलगाव क- साडे- घोटी- केम रस्ता प्रजिमा १० सुधारणा करणेसाठी नाबार्डकडून ०१ कोटी ७७ लाख, रोपळे- केम- वडशिवणे- कंदर- कन्हेरगाव प्रजिमा १२ सुधारणा करणे यासाठी ०१ कोटी ९० लाख, पारेवाडी- राजुरी- अंजनडोह- कोंढेज- निंभोरे- मलवडी- दहिवली- कन्हेरगाव- वेणेगाव रामा क्रमांक ९ ला जोडणारा प्रजिमा क्रमांक ४ सुधारणा करणे यासाठी ०३ कोटी २५ लाख, कोर्टी- दिवेगव्हाण- पारेवाडी रेल्वे स्टेशन- केत्तुर-२ ते पोमलवाडी रस्ता प्रजिमा १२४ सुधारणा करणे यासाठी ०२ कोटी २५ लाख, कुर्डूवाडी- परंडा रस्ता रामा २१० सुधारणा करणे ०२ कोटी ५० लाख, केम- ढवळस- पिंपळकुटे रस्ता प्रजिमा १४ सुधारणा करणे ०२ कोटी ८५ लाख, बोरगाव- करंजे- मिरगव्हाण- कोळगाव- निमगाव- गौंडरे- नेरले ते वरकुटे- घोटी- निंभोरे ते जेऊर या रस्त्यासाठी ०२ कोटी ८५ लाख, ढवळस- चोभेपिंपरी- कव्हे रस्ता प्रजिमा १५ साठी ०१ कोटी 90 लाख, कव्हे- लहू म्हैसगाव ते रामा १४५ ला मिळणारा रस्ता प्रजिमा १६ साठी ०१ कोटी ९० लाख असे एकूण १० रस्त्यांच्या विकासासाठी २४ कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद रस्ते योजनेअंतर्गत मतदार संघातील साडे, दिलमेश्वर, गुळसडी, सालसे, रावगाव, फीसरे, उपळवटे, महादेववाडी आदी ३२ गावातील रस्त्यांसाठी ४ कोटी पेक्षा अधिक निधीची तरतूद झाली असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
याशिवाय करमाळा शहरांमध्ये टाऊन हॉल बांधणे, नगरपरिषद इमारतीचे बांधकाम करणे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणे यासाठीही १० कोटींहून अधिक निधीची तरतूद होणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.




