-->
करमाळाराजकिय

BREAKING: सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपाच्या गटनेतेपदी रश्मी बागल यांची निवड

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत ३८ जिल्हा परिषद सदस्य विजयी झाले असून या विजयी उमेदवारांमधून भाजपा तर्फे सोलापूर जिल्हा परिषद सभागृहामध्ये पक्षाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी गटनेता व इतर निवडी जाहीर केल्या आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी करमाळा तालुक्यातील पांडे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या भाजपाच्या नेत्या तथा भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे करमाळा तालुक्याच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

मंगळवार दि. १० मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत भाजपाच्या जिल्हा परिषद गटनेतेपदासाठी रश्मी बागल यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

 

या बैठकीत सोलापूर जिल्हा परिषदेसाठी भाजप पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून यामध्ये गटनेतेपदी रश्मी बागल (करमाळा), उपनेतेपदी प्रदीप खांडेकर (मंगळवेढा), प्रतोदपदी चेतनसिंह केदार (सांगोला) तर प्रवक्तेपदी नेताजी खंडागळे (दक्षिण सोलापूर) यांच्या निवडी करण्यात आलेल्या आहेत.

 

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये यंदा प्रथमच स्वीकृत सदस्यांच्या निवडी होणार असल्यामुळे गटनेतेपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या पदावर निवड झालेल्या रश्मी बागल यांच्याकडे जिल्हा परिषदेतील पक्ष संघटन आणि समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे. रश्मी बागल यांच्या निवडीमुळे करमाळा तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close