-->
करमाळाक्राईम

धक्कादायक ! नराधम बापाने ८ महिन्याच्या मुलीला दारू पाजली तर 9 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

माय मराठी न्युज

डोंबिवली- दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेमध्ये माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याचे त्यालाच काही भान राहत नसते. या दारूच्या व्यसनामुळे अनेक घरे उध्वस्त झाली आहे. तरी या दारूचे व्यसन लोकांना सुटता सुटत नाही. दारूच्या नशेत अशाच एका बापाने बाप-लेकिच्या नात्याला काळिमा फासणारी घटना डोंबिवली पश्चिमेत विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या ९ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत तर आपल्याच दुसऱ्या अवघ्या ८ महिन्याच्या निरागस मुलीला दारू पाजन्याचे घाणेरडे कृत्य केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर माहिती अशी की, एका नराधम बापाने ऑक्टोबर महिन्यात आपली पत्नी गावी गेली असता नऊ वर्षाच्या मुलीला अंघोळ घालण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला. आई गावावरून आल्यावर मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने याकडे दुर्लक्ष केल्यानंतर मुलगी सतत रडायची. आईने तिला विचारले तेव्हा तिने घडलेले सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने आपल्या पतीला याबद्दल विचारल्यावर ती लहान आहे तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. असे म्हणून तिला गप्प केले. ऑक्टोबर मध्ये पुन्हा एकदा बेडरूम मधून रात्रीच्या वेळी मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आल्यावर सकाळी आईने मुलीला रात्री रडण्याचे कारण विचारले असता वडिलांनी माझ्यासोबत असे केले. एवढेच नव्हे तर, त्या नराधमाने आपल्या अवघ्या आठ महिन्याच्या चिमुकलीला दारू पाजली आणि पत्नीला मारहाण केली. पत्नीने कंटाळून शुक्रवारी विष्णू नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि आपल्या नराधमी नवऱ्याची तक्रार केली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी ४९ वर्षीय आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला करून सदर आरोपीला अटक केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close