-->
आरोग्यकरमाळाराजकियविशेष

८ दिवसात ५ रुग्णांना साडेतीन लाखाची मदत; करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची कामगिरी

 

करमाळा/प्रतिनिधी

 

संवेदनशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून गेल्या आठ दिवसात करमाळा तालुक्यातील पाच रुग्णांना एकूण साडेतीन लाख रुपयांची आर्थिक मदत संबंधित रुग्ण उपचार घेत असलेल्या हॉस्पिटलच्या खात्यावर जमा झाली असून या योजनेचा तालुक्यातील जनतेला मोठा उपयोग झाल्यामुळे रुग्णांकडून समाधान व्यक्त होत आहे.

 

करमाळा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रोहित वायबसे, वैद्यकीय कक्ष तालुका समन्वयक दीपक पाटणे, सहसमन्वयक शिवकुमार चिवटे, रुग्ण सहाय्यक नागेश चेंडगे या कार्यकर्त्यांनी संबंधित रुग्णांचे कागदपत्र घेऊन विहित नमुन्यात अर्ज मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षात जमा करून हा निधी मिळून देण्यास प्रमुख भूमिका बजावली.

 

भुजंग कृष्णाजी गीते (रा. वंजारवाडी) यांना गुडघ्याच्या ऑपरेशन साठी पन्नास हजार रुपये मदत झाली आहे. सुमित्रा पोपट खराडे (रा. मोहल्ला गल्ली, करमाळा) या मुलीला एक लाख रुपयाची मदत झाली. मंगल अप्पाराव घुले यांना पन्नास हजाराची मदत झाली आहे. नारायण गुरुदेव इंगळे (रा. कंदर) यांना व यशोदा बाळासाहेब जाधव (रा. वीट) यांना प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत झाली आहे.

 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे करमाळा येथे स्वतंत्र कार्यालय असून जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यरत आहे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णाला सविस्तर माहिती देऊन संबंधित रुग्णाचा अर्ज भरून हा अर्ज ऑनलाइन मुख्यमंत्री कार्यालयात दाखल केला जातो व याचा संपूर्ण पाठपुरावा करून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्यकर्ते संबंधित रुग्णाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. ज्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची मदत हवी असेल त्यांनी करमाळा येथील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन रोहित वायबसे यांनी केले.

 

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा या कार्यालयातून परिपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयात दाखल केला जातो. येणाऱ्या रुग्णाला संपूर्णपणे सखोल माहिती दिली जाते व संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करून संबंधित रुग्ण उपचार घेत असलेल्या हॉस्पिटल वरच्या खात्यावर रक्कम जमा होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा केला जातो. गेल्या ६ महिन्यात करमाळा येथील कार्यालयातून जवळपास ४० लाख रुपयांची आर्थिक मदत गरजू रुग्णांना मिळून देण्यात आली आहे. रुग्णांना त्यांच्या बिलात सवलत मिळून देण्याशिवाय चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटल मधील १० टक्के हातामधील जागा रुग्णांना उपलब्ध करून देण्यास आम्ही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहोत.

मा.श्री. महेश चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख, सोलापूर

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close