-->
करमाळाराजकियसामाजिक

सोलापूर जिल्हा प्रहार ची टीम पुरग्रस्तांसाठी मदत घेऊन सांगलीला रवाना

 

केम प्रतिनिधी

एक हात मदतीचा

गेल्या आठ दिवसापूर्वी कोकणासह कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते आणि भयंकर अशा महापुराने लोकांच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं करून टाकलं. अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले. अनेक लोकांना या जलप्रलयात जीवाला मुकावे लागले. अनेक लोकांवर निसर्गाच्या या आघातामुळे उपासमारीची वेळ आली. यात बाधित झालेल्या लोकांना सोलापूर प्रहार ने सामाजिक बांधिलकी जपत मदत रवाना केली.

अशा या संकटाच्या वेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री लोकनायक बच्चु भाऊ यांनी आवाहन केले. महाराष्ट्रातील प्रहार सैनिकांनी फक्त श्रद्धांजली वाहून आपलं कर्तव्य संपत नाही तर प्रत्यक्षात या संकटकाळी त्यांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना हात देण्याची गरज आहे आणि या आवाहानाला सोलापूर जिल्हा प्रहारच्या संपूर्ण टीमने अतिशय गांभीर्याने घेत गेल्या चार ते पाच दिवसात संपूर्ण जिल्ह्यातून अनेक जीवनोपयोगी वस्तुंचा संग्रह केला. यात प्रहारचे प्रहार सैनिक तर होतेच परंतु काही जिल्हावासियांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत मदत केली आणि थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीतून आज एक टेम्पो भरून प्रहारची सर्व टीम सांगली कडे रवाना झाली.

यात जीवनावश्यक वस्तूमध्ये

१००० चादरी,५०० साड्या, २५० किराणा किट, २०० टॉवेल,२०० टी-शर्ट, सॅनिटरी नॅपकिन, २० क्विंटल तांदूळ, २०० बिस्कीट चे बॉक्स, २०० पाणी बॉक्स, ५०० खाद्यान्नाची पाकिट

अशा अनेक छोट्या-मोठ्या जीवनोपयोगी वस्तूंची मदत घेऊन आज सांगली जिल्ह्यात प्रहारच्या टीम कडून ज्यांना खरंच मदतीची गरज आहे अशा लोकांना समक्ष जाऊन वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी प्रहार चे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, कार्याध्यक्ष खालिद भाई मणियार, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे, संघटक दीपक नाईकनवरे, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, नागेश शिंगाडे, राजू सावंत, बापू घोडके, युनूस पठाण, सोमनाथ जाधव, सोनू लोखंडे, अभिमान घंटे, सद्दाम शेख इत्यादी अनेक प्रहार सैनिक सोबत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close