-->
करमाळामहिलाविषयकसामाजिक

कौतुकास्पद: लोकस्वराज प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम; विधवा महिलांना केले शेळ्यांचे वाटप

 

जेऊर प्रतिनिधी/आबासाहेब झिंजाडे

 

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे लोकस्वराज ग्रामविकास प्रतिष्ठाण जेऊर, एकल महिला पुनर्वसन समिती तसेच महाराष्ट्र व महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ, पुणे यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील ज्या महिलांच्या पतीचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले आहे. अशा सोळा विधवा महिलांना प्रत्येकी एका शेळीचे वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती लोकस्वराज प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. सविता शिंदे यांनी दिली आहे.

 

 

या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. माने साहेब आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, एक शेळी व्यवस्थित सांभाळल्यास सुमारे एका वर्षाने या विधवा महिलेचे घर त्या उत्पन्नावर चालू शकेल. त्यामुळे विधवा महिलांना शेळी वाटपाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यावेळी ॲड. सविता शिंदे यांनी कोरोना महामारीमुळे विधवा झालेल्या महिलांना शेळी वाटप करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. कोरोना महामारीमुळे अनेक तरुण लोकांचे प्राण गेले. त्यामुळे अचानक असंख्य महिलांवर संकट कोसळले. त्यातून आपले कुटुंब सावरण्यासाठी अशा महिलांना मदतीची गरज असल्यामुळे शेळी वाटपाचा उपक्रम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

या उपक्रमास महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ, कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती, हेरंब कुलकर्णी व ॲड. संध्या गोखले इ. नी सहकार्य केल्याचेही ॲड. सविता शिंदे यांनी सांगितले. तसेच महिलांनी शेळीपालन उद्योगातून प्रगती करावी असे आवाहन केले.

 

 

याप्रसंगी कोरोना महामारीमुळे विधवा झालेल्या महिलांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच लोकस्वराज प्रतिष्ठानचे सम्राट जाधव, ॲड. योगेश शिंपी, तेजस ढेरे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जिल्हा अध्यक्षा आशाताई चांदणे, नूतन शिंदे यांची भाषणे झाली. या कार्यक्रमास बाळासाहेब करचे, नितीन खटके, ॲड. अपर्णा पद्माळे, साधना खरात उपस्थित होत्या. कार्यक्रमास हेमंत शिंदे, आरती शिंदे, माया कदम, दत्ता हिरडे, विजया कर्णवर यांनी सहकार्य केले. प्रेरणा व्होटकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमात तालुक्यातील ज्येष्ठ समाजवादी नेते शंकर बाबुराव रोकडे (दादा) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close