-->
करमाळाराजकिय

मातोश्रीवर जावुन पालकमंत्री भरणे यांनी उद्धवसाहेबांची माफी मागावी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांची मागणी

करमाळा प्रतिनिधी

सोलापूर येथील जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री जावुद्या मरुद्या अशी भाषा वापरली असुन पालकमंत्री पदाला भाषा शोभत नाही त्यांनी तात्काळ मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागावी आशी मागणी युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सर्व पालक मंत्री यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावलण्याचे काम केले आहे वास्तविक त्यांनी सर्व समावेशक धोरण आखणे गरजेचे होते मात्र राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांना त्यांनी हाताशी धल्याचे चित्र जिल्ह्यात पहावायस मिळत आहे.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हे पहिल्या दिवसापासून त्यांच्या मतदारसंघाचा विचार करत आहेत.सोलापूर चे पाणी पळवण्याचा डाव सोलापूर करांनी उधळुन लावल्यानंतर ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. आज सोलापूर येथील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री जाऊद्या मरुद्या असा शब्द वापरताना मात्र अजितदादा आमचे नेते असल्याचा उल्लेख असुन अजित पवार यांच्या विषयी मात्र आदराने बोलणार्‍या पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यां विषयी कसे शब्द वापरावेत हे माहीत नाही का ? असा सवाल देखील युवा सेना तालुका समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी विचारला आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close