प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांसाठी आदर्शाचा.. कर्तृत्वाचा.. प्रेरणास्त्रोत आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा सत्यसाई सेवा संघटनेचे अध्यक्ष सुनिल वागस्कर यांनी केले.
फुलगाव, ता.हवेली येथील हरी उध्दव धोत्रे माध्यमिक विद्यालया मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १९१ वी जयंती कार्यक्रमा मध्ये वागस्कर बोलत होते. अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक शरद वाखारे होते. प्रबोधनकार ज्ञानेश्वर मुडगुले, गणेश वागस्कर, पालक शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. वागस्कर पुढे म्हणाले, कोरोना संपलेला नाही प्रत्येकानी आपली व कुटुंबाची काळजी घेतली पाहीजे. समाज बदलण्यासाठी चांगल्या गोष्टींची स्विकार केला पाहीजे. आज विविधांगी क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या समस्त स्त्रियांच्या कर्तृत्वाचा पाया स्त्री शिक्षणाच्या कार्यातून ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी रचला आहे. सावित्रीबाईच जिवन चरित्र अभ्यास करा त्यांच्या विचारातून शिक्षण नात संस्काराची जोड दिली पाहीजे ध्येय निच्छित ठेवा खुप चिकाटी मेहनत घेतली तर यशाच्या शिकरावर पोचाल असे वागस्कर यावेळी म्हणाले. सावित्रीबाई फुले यांच्या जिवन चरित्रावर प्रबोधनकार ज्ञानेश्वर मिडगुले याचे व्याख्यान झाले. तर मुक्त पत्रकार के. डी. गव्हाणे यांनी प्रकाशित केलेल्या सुयश विद्यार्थी दिनदर्शिकेच्या २४ व्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते करून त्यांना मोफत दिनदर्शिका वाटप करण्यात आले.
याप्रसंगी साक्षी वाघुले व इतरांनी भाषणे केली. तर प्रश्न मजुंशा स्पर्धेतील पाच यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एस. बी. केकान यांनी स्वागत व सुत्र संचालन केले तर श्रीरंग जाधव यांनी आभार मानले.




